पनवेल : रामप्रहर वृत्त
सीकेटी इंग्रजी माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. प्रमुख अतिथी सीकेटी सिनिअर कॉलेजच्या हिंदी विभाग प्रमुख डॉ. गितिका तुनावर होत्या. या वेळी मुख्याध्यापिका निलिमा शिंदे (इंग्रजी प्राथमिक), पर्यवेक्षक मोरे सर, पर्यवेक्षिका पूर्व प्राथमिक संध्या अय्यर तसेच शिक्षक पालक संघाच्या सदस्य सौ. जाधव या उपस्थित होत्या. या वेळी विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये इयत्तानुसार विविध स्पर्धाही घेण्यात आल्या. जसे कविता गायन भाषण, देशभक्तीपर गीत, नाटक नृत्य इत्यादी या कार्यक्रमाची सुरूवात स्वर म्हात्रे या इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्याने सरस्वती वंदना गायन करून केली. तसेच विद्यार्थ्यांनी स्वागतगीतही सादर केले. या वेळी बोलताना डॉ. गितीका तुनावर यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. जिवनात शिक्षणाचे महत्त्व आहेच, परंतु सर्वांगिण विकासासाठी अनेक कलागुणांची जोपासना करा. शारिरिक सौष्ठवाकडे लक्ष द्या. मैदानी खेळ खेळा, असा संदेश विद्यार्थ्यांना दिला आणि आपल्या अतिशय समृद्ध हिंदी भाषेत हिंदी दिवसाचे आणि हिंदी भाषेचे महत्त्व विषद केले. हिंदीतील संतकवी आणि आधुनिक कवींचे हिंदी भाषा समृद्ध करण्यातले योगदान किती महत्त्वाचे आहे हे सांगितले. सांस्कृतिक एकात्मकता, राष्ट्रीय एकताचे प्रतिक हिंदी भाषा मुख्याध्यापक संतोष चव्हाण सर्व विद्यार्थ्यांचे उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल कौतुक केले. तसेच कार्यक्रमात भाग घेण्याबद्दल विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक संतोष चव्हाण, पर्यवेक्षिका निरजा, सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. ताम्हणकर, हिंदी विभाग प्रमुख कौर मॅडम, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.