Breaking News

पुरेसे पाणी प्या आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढवा

सध्या कोरोनाच्या जीवघेण्या आजारापासून वाचण्यासाठी सर्वच ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाची लागण होऊ नये किंवा कोरोनाची लागण झाल्यास या आजारातून लवकर बाहरे येणे गरजेच आहे. त्यासाठी सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे रोगप्रतिकारकशक्ती वाढवणे. रोगप्रतिकारकशक्ती चांगली असल्यास आपण आजारांपासून लढू शकतो. त्यासाठी पोषक घटक मिळत असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा. पाणी पिऊनसुद्धा तुम्ही तुमची रोगप्रतिकारकशक्ती वाढवू शकता येते.

पाणी शरीरासाठी खूप आवश्यक असते. पाण्याचे योग्य प्रमाणात सेवन शरिरातील टॉक्सिन्स बाहेर निघून जाण्यास मदत होते. याशिवाय शरिरातील तापमानसुद्धा कमी होते. आजारांचे कारण ठरत असलेले बॅक्टेरिया आणि व्हायरस शरिरातून बाहेर निघून जाण्यासाठी पाण्याची मदत होते.

शरीरात पाणी पुरेसे असेल तर पेशींपर्यंत ऑक्सिजन पोहोचण्यासाठी फायदेशीर ठरते. नेहमी हेल्दी आणि फिट राहण्यासाठी दिवसभरातून कमीत कमी आठ ते 10 ग्लास पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्हाला सतत पाणी प्यायला आवडत नसेल, तर वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही पाण्याचे सेवन करू शकता. पाण्यात लिंबू किंवा पुदिन्याचा समावेश करून तुम्ही सेवन करू शकता.

लिंबात व्हिटॅमिन सी पोटॅशियमचे प्रमाण मूबलक असते. शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी लिंबाचे सेवन फायदेशीर ठरते. दिवसाच्या सुरुवातीला लिंबू घातलेल्या गरम पाण्याचे सेवन केल्यास शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघून जाण्यासाठी मदत होईल. त्यामुळे लठ्ठपणा, पोटाचे विकार कमी होण्यास फायदेशीर ठरेल.

पुदिन्याला औषधीयदृष्ट्या खूप महत्त्व आहे. त्यात अनेक एण्टी इम्फ्लेमेटरी आणि एण्टी ऑक्सिडेंटल गुण असतात. त्यामुळे फ्री रेडिक्लस अ‍ॅक्टिव्हीटी रोखण्यास मदत होते. शरीर डिटॉक्स करण्यासाठी पुदिन्याचे पाणी फायदेशीर ठरते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply