Breaking News

जिल्ह्यात 33 नवीन कोरोना रुग्णांची वाढ

अलिबाग : जिमाका – जिल्हा प्रशासनाने दि.01 मार्च ते 21 मे 2020 दरम्यानचा जिल्ह्यातील करोना संबंधीत नागरिकांचा तपशिल कळविला आहे.

जिल्ह्यातील एकूण परदेश प्रवासावरून परतलेल्या नागरिकांची संख्या 1 मार्च ते 21 मे – 1 हजार 637, परदेश प्रवासावरुन परतल्यानंतर निरीक्षणाखाली असलेल्या परंतु 14 दिवसांचा इन्क्युबेशन कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या-1 हजार 589, कोविड-19 बाधित व्यक्तींच्या संपर्कात निरीक्षणाखाली असलेल्या नागरिकांची संख्या-24 हजार 380, कोविड-19 बाधित व्यक्तींच्या संपर्कात असलेल्या व घरामध्ये अलगीकरणात ठेवलेल्या परंतु 14 दिवसांचा इन्क्युबेशन कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या- 10 हजार 327 गुरुवारी घरामध्ये अलगीकरण असलेले नागरिक- 13 हजार 121, शासकीय अलगीकरण कक्षामध्ये असलेले नागरिक- 309. आतापर्यंत जिल्हृयात तपासणी अंती पॉझिटिव्ह रिपोर्ट प्राप्त एकूण नागरिकांची संख्या- 623.    

सद्य:स्थितीत कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या नागरिकांची संख्या- एकूण 327  (पनवेल मनपा-137, पनवेल ग्रामीण-72, उरण-98, खालापूर-2, कर्जत-1, पेण-3, अलिबाग-1, माणगाव-10, तळा-1, महाड-2). कोविड-19 ने बाधित झालेले व उपचारानंतर बर्‍या झालेल्या नागरिकांची संख्या- एकूण 270 (पनवेल मनपा-167, पनवेल ग्रामीण 53, उरण-36, खालापूर-1, कर्जत-3, पेण-1, अलिबाग-3, श्रीवर्धन-5, पोलादपूर-1).  मयत नागरिकांची संख्या-26 (पनवेल मनपा-14, पनवेल ग्रामीण-3, खालापूर-1, कर्जत-2, अलिबाग-1, मुरुड-1, महाड-3, पोलादपूर-1).  दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत झालेली वाढ-33 (पनवेल मनपा-13, पनवेल (ग्रा)-12, उरण-4, खालापूर-1, कर्जत-1,  माणगाव-1, महाड-1). दिवसातील कोविड बाधित बरे झालेले रुग्ण- 50 (पनवेल मनपा-16, पनवेल ग्रामीण-18, उरण-16) दिवसातील मृत पावलेले रुग्ण- 3 (पनवेल मनपा-2, कर्जत-1).

नागरिकांच्या स्वॅब तपासणीबाबत माहिती

जिल्ह्यातून कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या नागरिकांची संख्या- 2 हजार 418, कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणी केल्यानंतर स्वॅब टेस्टींग न करण्याचा निर्णय घेण्यात आलेल्या नागरिकांची संख्या- 36, स्वॅब तपासणी केलेल्या नागरिकांची संख्या-2 हजार 382, तपासणीअंती निगेटिव्ह रिपोर्ट प्राप्त नागरिकांची संख्या- 1 हजार 686, तपासणीअंती  रिपोर्ट  मिळण्यासाठी प्रलंबित असणार्‍या नागरिकांची संख्या- 73. आतापर्यंत जिल्हृयात तपासणी अंती पॉझिटिव्ह रिपोर्ट प्राप्त एकूण नागरिकांची संख्या- 623.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply