Breaking News

पेणमध्ये महिलेवर लैंगिक अत्याचार

पेण : प्रतिनिधी – पेण तालुक्यातील महिला फिर्यादी (रा. महाडिकवाडी) हिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी (रा. रोडे काश्मिरे) याच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी माहिती अशी कि, दिनांक 11 मार्च 2020 ते दि.19 मे 2020 दरम्यान आरोपी (रा.रोडे काश्मिरे ता.पेण) याने 11 मार्चपासून महिला फिर्यादी (रा.महाडीकवाडी ता.पेण) ह्या कॉलेजला एकटीच पायी चालत जात असताना तिचा पाठलाग करून हिच्याशी ओळख केली. तिच्या अज्ञातपणाचा फायदा घेवून तिला फिरण्यासाठी घेवून जावून प्रेम संबंधाबाबत आई वडीलांना सांगेन अशी धमकी देवून पेण येथील हॉटेल येथे नेवून तिच्याशी जबरदस्तीने शरीर संबंध केले व वेळोवेळी तिला फोन करून शरीर संबंधाची मागणी केली. त्यामुळे या महिलेने पेण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपीला मंगळवार 19 मे रोजी अटक करण्यात आली आहे.

 या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात  गुन्हा  र.जि. क्र. 93/2020 नुसार भा. दं. वि. कलम 376 (3), 323, 341, 506, बाळ लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा (पॉक्सो) अधिनियम 2012चे कलम 4, 6, 8, 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पिंपळे हे करीत आहेत.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply