Breaking News

रायगडात ‘मेरा आंगण, मेरा रणांगण’

भाजपकडून राज्य सरकारविरोधात ठिकठिकाणी तीव्र आंदोलन

खोपोली : प्रतिनिधी

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करीत भाजपने रायगडात खालापूर, खोपोली, अलिबाग आदी ठिकठिकाणी निषेध निदर्शने केली, सरकारच्या विरोधात फलक हातात घेऊन कार्यकर्त्यांनी आपापल्या घरासमोरील अंगणात आंदोलनाचा कार्यक्रम केला. सोशल डिस्टन्सिंग व संचारबंदी नियमांच्या अधीन राहून कार्यकर्त्यांनी आघाडी सरकारविरोधात रोष व्यक्त केला. या वेळी रायगड जिल्हा भाजप महिला अध्यक्षा अश्विनी पाटील यांच्या घराच्या प्रांगणात झालेल्या निषेध कार्यक्रमाला शहरअध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, परिवहन सभापती तुकाराम साबळे, शहर सचिव ईश्वर शिंपी उपस्थित होते. दरम्यान, तालुका अध्यक्ष बापू घारे, जिल्हा कोषाध्यक्ष सनी यादव, तालुका युवा मोर्चा अध्यक्ष प्रसाद पाटील, खोपोली सरचिटणीस हेमंत नांदे, नगरसेविका अपर्णा मोरे, भाजपचे युवा नेते सचिन मोरे, युवा मोर्चा शहराध्यक्ष अजय इंगुलकर, पूनीत तन्ना, सचिव विनायक माडपे, माजी शहराध्यक्ष श्रीकांत पुरी, विजय तेंडुलकर, राकेश दबके, महिला मोर्चा अध्यक्षा शोभा काटे, रसिका शेट्ये, स्वाती बिवरे व त्यांच्या सहकारी कार्यकर्त्यांनी माझे आंगण माझे रणांगण कार्यक्रम नियमाच्या अधीन राहून आपापल्या निवासस्थानाच्या अंगणात केला.

महाविकास आघाडीचा चौकमध्येही जोरदार निषेध

कोरोना या संसर्गजन्य विषाणूच्या लढाईत राज्यसरकार अपयशी ठरल्याचा आरोप करून त्याच्या निषेधार्थ शनिवारी अंगण हेच रणांगण ठरवून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ते यांनी सोशल डिस्टन्स ठेऊन, काळा मास्क लावून निषेधाचे फलक दाखविले. राज्य सरकार जीवनावश्यक व ज्याची आज नितांत गरज आहे, त्या आरोग्यसेवा, पोलीसदल यांना वाचवू शकले नाही, त्याचा निषेधार्थ आज अपयशी फलक दाखवून राज्य सरकारचा निषेध केल्याचे माजी आमदार देवेंद्र साटम यांनी सांगितले. या वेळी चौक बाजारपेठमध्ये माजी आमदार देवेंद्र साटम यांच्यासमवेत माजी सभापती रामदास ठोंबरे, शहा, गणेश मुकादम, गणेश कदम यांनी फलक दाखवून निषेध व्यक्त केला.

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply