पनवेल : रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यात दिवाळीनंतर वाढलेली कोरोना रुग्णांची संख्या आता पुन्हा घटू लागली असून, रविवारी (दि. 6) नव्या 77 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली, तर दिवसभरात 59 रुग्ण बरे झाले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 45 व ग्रामीण 9) तालुक्यातील 54, पेण नऊ, महाड सहा, खालापूर व रोहा तालुक्यातील प्रत्येकी तीन आणि अलिबाग व माणगाव तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
दरम्यान, नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 57,850 झाला असून, मृतांची संख्या 1612 आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 55,219 जण कोरोनामुक्त झाले असून, 1019 सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
Check Also
कामोठ्यातील ‘एल.के. विवांता’च्या अनधिकृत बांधकामावर तातडीने कारवाई करा
मनपा लोकप्रतिनिधींची आयुक्तांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तकामोठे सेक्टर २२ येथील प्लॉट क्रमांक ७३/७४वर असलेल्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper