अलिबाग : प्रतिनिधी – अलिबाग येथील कारागृहातून पळून गेलेल्या दुसर्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. एक आरोपी जखमी झाल्यामुळे तो ताबडतोब सापडला. दुसर्या आरोपीला शुक्रवारी (दि. 22) रात्री कोलाड येथे अटक करण्यात आली.अलिबाग कारागृहातून कैदी पळून जाण्या घटना यापुर्वीही अशा घडल्या आहेत. या घटनेमुळे तुरुंग व्यवस्थापनातील त्रुटी समोर आळ्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. बलात्काराच्या गुन्ह्यात अटकेत असलेले दोन कैदी शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास अलिबागच्या कारागृहातून पळाले. कारागृहाच्या भिंतीवरून या दोघांनी उडी मारली. यातील एक जायबंदी झाल्याने पोलीसांच्या तावडीत सापडला. तर दुसरा पळून गेला. रात्री उशीरा त्याला कोलाडजवळ पोलिसांनी अटक केली.
Check Also
बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट
चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …
RamPrahar – The Panvel Daily Paper