Breaking News

ऐतिहासिक जंजिरा किल्ल्याला सुरक्षा; अतिरेकी कारवाईच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त

मुरूड : प्रतिनिधी

येथील ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यात अतिरेकी हे पर्यटकांना ओलीस ठेवून देशविघातक कृत्य करू शकतात असा पोलीस यंत्रणेचा गुप्त अहवाल असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्या अनुषंगाने येथे सशस्त्र पोलीस तैनात करण्यात आले आहेत. ऐतिहासिक जंजिरा किल्ला हा सर्वदूर प्रसिद्ध असून, तो पहाण्यासाठी असंख्य पर्यटक येत असतात, पण या किल्ल्यास कोणतीही सुरक्षा नव्हती. त्यामुळे सर्वांना मुक्त संचार होता. अतिरेकी येथील पर्यटकांना ओलीस ठेवून देशविघातक कृत्य करू शकतात असा पोलीस यंत्रणेचा गुप्त अहवाल असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, ऐतिहासिक जंजिरा किल्लावर सुरक्षा व्यवस्थेची प्रचंड कमतरता आहे अशी शक्यता वरिष्ठ अधिकार्‍यांकडून वर्तविण्यात आल्याने सागरी सुरक्षेसाठी तटरक्षक दलाचे जवान व स्थानिक पोलिसांकडून येथे गस्त घालण्यास सुरवात करण्यात आली आहे. याबाबत मुरूड पोलीस ठाण्याचे निरीक्षक परशुराम कांबळे यांनी सांगितले की, किल्ल्यात एक रायफलदारी पोलीस, महिला पोलीस व होमगार्ड असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, तर राजपुरी जेटीजवळ एक पोलीस व महिला पोलीस, खोराबंदरात एक पोलीस असा बंदोबस्त आहे. शनिवारी व रविवारच्या वेळी पर्यटकांची संख्या जास्त असते. त्याचा अंदाज घेऊन पोलीस बंदोबस्तात वाढ केली जात आहे. येणार्‍या पर्यटकांनी पोलिसांना सहकार्य करावे तसेच कुठेही संशयित व्यक्ती किंवा वस्तू दिसल्यास बोट मालक-चालक व स्थानिक नागरिकांनी पोलीस ठाण्यात कळवावे.

Check Also

खानावमध्ये शेकाप कार्यकर्ते भाजपात

आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले स्वागत पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाला पुन्हा …

Leave a Reply