Breaking News

मुरूडचे मच्छी मार्केट पाच दिवस बंद

मुरूड : प्रतिनिधी

एकदरा गावात कोरोनाचा रुग्ण आढळल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मुरूडमधील मच्छी मार्केट पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती महादेव कोळी समाज अध्यक्ष नवापाडा मनोहर बैले यांनी दिली.

मुरूडला लागूनच असलेल्या एकदरा गावात कोरोनाचा रुग्ण आढळून आला आहे. एकदरातील लोक मासळी विकण्यासाठी मुरूडमधील मच्छी मार्केटमध्ये येत असतात. या पार्श्वभूमीवर सागर कन्या मच्छीमार सोसायटीची सभा नुकतीच झाली. या सभेत मच्छी मार्केट पाच दिवस बंद करण्याचे ठरले. भविष्यात रुग्ण वाढले, तर मार्केट बेमुदत बंद करणार असल्याचे अध्यक्ष बैले यांनी सांगितले. या बैठकीला स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कोळी समाजाचे लोक उपस्थित होते.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply