Breaking News

फणसाड अभयारण्यात मुबलक पाणी; वन्यजीवांना दिलासा

मुरूड : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणीटंचाई जाणवत असताना मुरूड तालुक्यातील सुपेगाव परिसरात असलेल्या फणसाड अभयारण्यात मुबलक पाणी उपलब्ध आहे. येथे तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांतील पाण्याद्वारे वन्यजीव आपली तहान भागवत असल्याचे सुखद चित्र पाहावयास मिळत आहे.

सुमारे 54 चौरस किलोमीटर असलेल्या फणसाड अभयारण्यात मुरूडसह रोहा व अलिबाग तालुक्याच्या सीमारेषेचा समावेश होतो. मुंबईपासून 160 किमी अंतरावरील हे अभयारण्य म्हणजे निसर्गाचे वरदान आहे. या अभयारण्यात विविध प्राणी, पक्षी व वृक्ष आढळतात. येथे पाण्याचे 27 नैसर्गिक स्रोत असून, कृत्रिम 11 बशी तलाव व 15 वन तलाव तयार करण्यात आले आहेत. सध्या मुरूड तालुक्याचे तापमान 38 डिग्री सेल्सियस असून, पाण्याचा तुटवडा भासू नये यासाठी तलावांच्या ठिकाणी चार बोअरिंगसुद्धा मारण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर अन्य ठिकाणाहूनसुद्धा गाडीच्या सहाय्याने पाणी आणून वन्यजीवांची तहान भागवण्याचे काम अभयारण्य अधिकारी व कर्मचार्‍यांकडून

केले जात आहे.

फणसाड अभयारण्यात असंख्य वन्यजीव आहेत. ज्या ठिकाणी वन्यजीवांचा वावर आहे अशा ठिकाणी आम्ही कृत्रिम तलाव निर्माण केले आहेत, जेणेकरून वन्यजीव अगदी सहज पाणी पिऊ शकतात.

-राजवर्धन भोसले, वनपरिक्षेत्र अधिकारी, फणसाड अभयारण्य

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply