कर्जत : बातमीदार
मागील 65 दिवस सुरक्षित असलेल्या माथेरानमध्ये कोरोनाने अखेर प्रवेश केला आहे. मुंबईतून परतलेल्या कुटुंबातील एका 35 वर्षीय महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे कर्जत तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या नऊ झाली आहे.
मूळचे माथेरानकर असलेले अनेक लोक सध्या मुंबई येथून घरी परतत आहेत. या सर्वांना क्वारंटाइन केले जात आहे. स्टेट बँकेच्या विश्रामगृहात क्वारंटाइन केलेल्या एका कुटुंबातील महिलेचा स्वॅब कोरोना टेस्टसाठी घेण्यात आला होता. या टेस्टचा अहवाल कर्जत उपजिल्हा रुग्णालयास प्राप्त झाला असून, त्यात संबंधित महिलेला कोरोनाचे निदान झाले आहे. त्यामुळे या महिलेचा पती आणि मुलगी यांची कोरोना टेस्ट करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. याशिवाय माथेरानमधील स्टेट बँकेचे विश्रामगृह कंटेन्मेंट झोन करण्यास सुरुवात झाली असून, या विश्रामगृहात असलेल्या अन्य पाच कुटुंबांना नगर परिषदेने क्वारंटाइन
केले आहे.