नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा
सिडको महामंडळातर्फे नवी मुंबईतील सिडकोच्या नळ जोडणीधारकांना पाणी देयके ऑनलाइन पद्धतीने भरण्याची सुविधा दिनांक 1 जानेवारी 2020 पासून उपलब्ध करून देण्यात आली असून ऑक्टोबर-नोव्हेंबर 2019 आणि यापुढील पाणी देयके ही केवळ ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारली जात आहेत. यातील ऑक्टोबर-नोव्हेंबर 2019 या कालावधीतील पाणी देयके ऑनलाईन भरण्याची अंतिम तारिख दिनांक 31 जानेवारी 2020 असून संबंधित नळ जोडणीधारकांनी सदरच्या काळातील पाणी देयके भरली नसल्यास उर्वरित मुदतीत लवकरात लवकर देयके ऑनलाईन भरावीत असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात येत आहे.
नवी मुंबई क्षेत्रातील सिडको प्रशासित गावे व काही नोड्सना सिडकोतर्फे पाणी पुरवठा करण्यात येतो. या गावांतील व नोड्समधील सिडकोच्या नळ जोडणीधारकांकरिता www.cidco.maharashtra.gov या सिडकोच्या अधिकृत संकेतस्थळावर पाणी देयके ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संकेतस्थळावर पाणी देयके भरण्यासाठी नळ जोडणीधारकांना त्यांचा ग्राहक क्रमांक माहित असणे आवश्यक आहे. पाणी देयकाची प्रत संकेतस्थळावरून डाऊनलोड करण्याचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दि. 1 जानेवारी, 2020 पासून नोड्ल कार्यालयांमधील पाणी देयक स्वीकृती केंद्रे बंद करण्यात आली असून पाणी देयके केवळ ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत. तसेच रोख/चेक/डीडी अशा कोणत्याही स्वरूपात आता पाणी देयके स्वीकारण्यात येत नाहीत, याचीही कृपया नळ जोडणीधारकांनी नोंद घ्यावी. ऑनलाइन पद्धतीद्वारे पाणी देयके प्राप्त करण्यास किंवा शुल्क भरण्यास काही अडचणी उद्भवल्यास नळ जोडणीधारकांनी संबंधित नोड्मधील पाणी पुरवठा विभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.