Breaking News

खोपटा येथे ट्रान्सफॉर्मरचा स्फोट

उरण : प्रतिनिधी

खोपटा खाडी पुलाजवळील रिलायन्स कंपाऊंडमधील ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊन आग लागण्याची घटना गुरुवारी (दि. 16) दुपारी घडली आहे. अग्निशमक दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण आणण्यास यश मिळाले आहे, मात्र ट्रान्सफॉर्मरमध्ये लागलेल्या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

गुरुवारी दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास द्रोणागिरी नोड परिसरातील खोपटा पुलाजवळील रिलायन्स कंपाऊंडमधिल ट्रान्सफॉर्मरमध्ये स्फोट होऊन आग लागण्याची दुदैवी घटना घडली आहे. आगीची तीव्रता एवढ्या मोठ्या प्रमाणात होती की आगीचे लोट आकाशात उंच झेप घेत होते. त्यामुळे प्रवाशी नागरिकांमध्ये भिंतीचे वातावरण निर्माण झाले होते.

या आगीच्या घटनेची माहिती सिडको, जेएनपीए येथील अग्निशमन दलाच्या जवानांना मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन आगीवर नियंत्रण आणले आहे.सदर विद्युत पुरवठा करणार्‍या ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊन आग कशामुळे लागली याचे नेमके समजू शकले नाही. तसेच कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसल्याचे महावितरण विभागाच्या कर्मचार्‍यांकडून सांगण्यात येत आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने उरण महावितरण विभागाचे उपअभियंता विजय सोनवणे यांच्याकडे घटनेची माहिती घेण्यासाठी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply