Friday , September 29 2023
Breaking News

रणजीतसिंह मोहिते-पाटील आज भाजपमध्ये

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून माघार घेतल्यानंतरही तेथील उमेदवारीचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे रणजीतसिंह मोहिते-पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आपण उद्या (बुधवारी) दुपारी 12.30 वाजता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा रणजीतसिंह यांनी मंगळवारी (दि. 19) पत्रकार परिषदेत केली. त्यापूर्वी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. भाजप नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीही रणजीतसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रवेशाला दुजोरा दिला आहे, तसेच आणखी काही मोठे नेते संपर्कात असल्याचे महाजन यांनी जळगावमध्ये सांगितले. डॉ. सुजय विखे-पाटील यांच्यानंतर रणजीतसिंहांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला पश्चिम महाराष्ट्रात जबर धक्का बसला आहे.

Check Also

पनवेलमधील रोजगार मेळाव्यात उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान

केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये …

Leave a Reply