Thursday , March 23 2023
Breaking News

पंतप्रधानांकडून गोव्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा

पणजी : प्रतिनिधी 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याचे नवे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत. मनोहर पर्रिकरांचे उत्तराधिकारी म्हणून निवड झाल्यानंतर सावंत यांनी मध्यरात्री मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. 

गोमंतकीयांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी आपण शुभेच्छा देत असल्याचे नमूद करून पंतप्रधान मोदी यांनी गोव्याच्या प्रगतीला नवी दिशा देण्याचे आवाहन केले आहे. गेल्या काही वर्षांत राज्यात केलेल्या विकासकामांचाही त्यांनी उल्लेख केला आहे. 

सावंत यांच्यासह 11 मंत्र्यांना मध्यरात्री राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी राजभवनावर शपथ दिली. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सर्वेसर्वा सुदिन ढवळीकर हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. मंत्रिपदाची शपथ घेणार्‍यांमध्ये मनोहर आजगावकर, रोहन खंवटे, गोविंद गावडे, विनोद पालयेकर, जयेश साळगांवकर, माविन गुदिन्हो, विश्वजित राणे, मिलिंद नाईक, नीलेश काब्राल यांचाही समावेश आहे.

Check Also

पनवेलमध्ये गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागताचा उत्साह

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमध्ये गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागत समितीच्या वतीने आयोजित शोभायात्रेत लहान मुलांसह महिला, …

Leave a Reply