Wednesday , February 8 2023
Breaking News

सोनारीत माजी सरपंच चषक क्रिकेट स्पर्धा

उरण : रामप्रहर वृत्त

माजी सरपंच व विद्यमान सदस्य महेश नरेश कडू यांच्या वतीने सोनारी येथे माजी सरपंच चषक 2019 रजनी क्रिकेट स्पर्धा 23 ते 25 मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे

यंदाचे तिसरे वर्ष आहे.

स्पर्धा ग्रामीण संघांसाठी खुली असून, प्रथम पारितोषिक एक लाख 77 हजार 777 रुपये आणि चांदीचा दीड किलो वजनाचा चषक, द्वितीय 88 हजार 888 रुपये व तृतीय पारितोषिक 55 हजार 555 रुपये आहे. त्याचबरोबर मालिकावीरास मोटरसायकल; तर सामनावीर, उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक यांना आकर्षक मनगटी घड्याळ देण्यात येणार आहे.

या स्पर्धेस रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार आशीष शेलार, सिडकोचे अध्यक्ष तथा भाजप जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जेएनपीटी विश्वस्त व भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस महेश बालदी, उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविंद कोळी, भाजप तालुका अध्यक्ष व नगरसेवक रवी भोईर, शहर अध्यक्ष व नगरसेवक कौशिक शहा, सुधीर घरत, दीपक भोईर, सी. एन. घरत, शेखर तांडेल, जितेंद्र पाटील, जितेंद्र घरत, नीळकंठ घरत, उद्योजक प्रकाश ठाकूर, मदन कोळी आदींची उपस्थिती लाभणार आहे.

या स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते 23 मार्च रोजी सायंकाळी 6 वा. होणार आहे; पारितोषिक वितरण समारंभ 25 रोजी रात्री 11 वा.  होणार आहे.

महेश कडू हे उरण तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष असल्याने त्यांच्या व असोसिएशनचे पदाधिकारी यांच्या संकल्पनेतून एक गाव 11 खेळाडू हे स्पर्धेचे मुख्य वैशिष्ट्य आहे.

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण

पनवेल : वार्ताहर परमपूज्य स्वामी अक्षयानंद सरस्वती महाराज यांच्या प्रेरणेने अक्षयधाम मंदिराचा आठवा वर्धापन दिन …

Leave a Reply