Breaking News

माणगाव तालुक्यात आणखी तीन कोरोना रुग्ण आढळले

बाधितांची संख्या 34वर

माणगाव : प्रतिनिधी – माणगाव तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, मूर, सणसवाडी व जोर या ठिकाणी नवीन तीन रुग्ण आढळले असल्याची माहिती तहसीलदार प्रियंका आयरे-कांबळे यांनी दिली. तालुक्यातील बाधित रुग्णांपैकी कुशेडे तर्फे गोवेले गावात सर्वप्रथम आढळलेला एकमेव रुग्ण बरा झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबई व अन्य ठिकाणांहून हजारो लोक माणगाव तालुक्यातील आपल्या मूळ गावी परतलेले आहेत. या पार्श्वभूमीवर रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तालुक्यात आतापर्यंत कुशेडे तर्फे गोवेले, मूठवली तर्फे तळे, कविलवहाळ, कालवण, कळमजे, वाकी तर्फे निजामपूर, पळसगाव बु.,पन्हळघर खुर्द, नगरोली, मूर, कोस्ते बु., रिळे, सणसवाडी, जोर, देवळी आदी गावांतून कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती प्रशासन घेत असून, बाहेरून आलेल्यांना क्वारंटाइन करण्यात येत असल्याचे तहसीलदार आयरे-कांबळे यांनी सांगितले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply