पनवेल ः रामप्रहर वृत्त
शहरामध्ये ठिकठिकाणी श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव साजरा करण्याची शेकडो वर्षांपासूनची प्रथा आजही कायम आहे. या पारंपरिक जन्माष्टमीच्या उत्सवाचे आयोजन पनवेलमध्ये बुधवारी (दि. 6) करण्यात आले होते. या उत्सवांना भाजपचे मावळ लोकसभा मतदारसंघ प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर आणि मनपाचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत दर्शन घेतले.
गोकुळाष्टमी म्हटले की, डोळ्यासमोर उभे राहतात त्या उंचच उंच दहीहंड्या, डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई आणि बक्षिसांची चढाओढ. श्रावण कृष्ण प्रतिपदेपासून या उत्सवाला सुरुवात होते. पनवेलमधील खारघर, पनवेल कोळीवाडा, लाईन आळी, रोहीदास वाडा, कुंभारवाडा, परदेशी आळी, गावदेवी पाडा, टपाल नाका, पोदी याठिकाणी विविध मंडळाच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या उत्सवाचे आयोजन केले होते. या उत्सावांना आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, युवामोर्चा शहर अध्यक्ष रोहीत जगताप, चिन्मय समेळ, यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट देत दर्शन घेतले.
Check Also
पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव
खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …