Breaking News

महाराष्ट्र पोलीस दलाला कोरोनाचा विळखा

एका दिवसात 91 पोलिसांना लागण

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात करोनाचा कहर वाढत असताना पोलीस दलातील अधिकारी, कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण दिवसेगणिक वाढतच आहेत. मागील चोवीस तासात 91 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. शनिवारपर्यंत कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा 2416पर्यंत पोहचला आहे. तर, आत्तापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधित पोलिसांमध्ये 183 अधिकारी आणि 1238 कर्मचार्‍यांचा समावेश आहे. मागील 24 तासांत 91 पोलीस कर्मचार्‍यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचार्‍यांमध्ये 16 पोलीस मुंबईतील, तीन नाशिक व दोन पुण्यातील असून प्रत्येकी एक सोलापूर, ठाणे आणि मुंबई पोलिसांच्या एटीएस शाखेतील आहेत. या आठवड्यात दररोज 100हून अधिक पोलीस अधिकार्‍यांना संसर्ग होत असल्याचं पोलिस दलातील अधिकार्‍याने म्हटले आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून मुंबईसह राज्यभरातील पोलीस आरोग्याची पर्वा न करता अहोरात्र पहारा देत आहेत. ही सेवा बजावताना अनेक पोलिसांना करोनाने गाठले आहे.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply