Breaking News

शुभेच्छा देण्यासाठी निवासस्थानी येऊ नका -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 2 जून रोजी वाढदिवस आहे. सध्या सुरू असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक व हितचिंतकांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी निवासस्थानी येऊ नये, असे आवाहन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले आहे. कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प होऊन जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक जण संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत कुणीही मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रत्यक्ष भेटण्यास येऊ नये. ज्यांना आपले आशीर्वाद आणि शुभेच्छा द्यायच्या असतील त्यांनी त्या फोनवरून तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून द्याव्यात. सर्वांचे माझ्यावर प्रेम आहे आणि ते वृद्धिंगत होत राहील असा मला विश्वास असल्याचेही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

Check Also

सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्तमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम अनेक अडथळे दूर करीत काही महिन्यांत पूर्णत्वास येणार …

Leave a Reply