Breaking News

भारतीयांच्या सेवा-शक्तीमुळे कोरोनाला रोखण्यात यश : पंतप्रधान; ‘मन की बात’ मधून देशवासीयांशी संवाद

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

इतर देशांच्या तुलनेत आपली लोकसंख्या अधिक आहे. तरीही कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असून मृत्यूदरही कमी आहे. जे नुकसान झाले त्याचे दु:ख आहेच, मात्र जे वाचवू शकलो त्याबद्दल जनतेचे आभार. कारण हा लढा जननेतृत्वात सुरू आहे. हा लढा प्रदीर्घ काळ चालेल. भारतीयांच्या सेवा-शक्तीमुळे कोरोनाला रोखण्यात यश आले. देशवासीयांची सेवाशक्ती हीच आपली खरी ताकद असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 31) ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमात देशवासीयांशी संवाद साधताना स्पष्ट केले.

कोरोनाच्या लसीवर देशात जे काम सुरू आहे, त्याकडे जगाच्या नजरा व आपल्या आशा आहेत. या संकटाचा अनुभवही नाही व अद्याप इलाजही नाही. त्यामुळे हा लढा दीर्घकालीन असेल. प्रत्येक वर्गाला कोरोनाचा फटका बसला, मात्र गरीब सर्वाधिक पिचले गेले. श्रमिक व इतर ट्रेन्स सुरू करण्यात आल्या. कोरोनापासून बचावासाठी विविध प्रकारे सावधगिरी बाळगत आपण आता विमान वाहतूक सुरू केली.हळूहळू उद्योग-व्यवसायही सुरू झालेत. अर्थव्यवस्थेचा मोठा भाग आता सुरू झाला आहे. त्यामुळे अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेळी केले.

पंतप्रधान म्हणाले की, देशातील नागरिकांच्या सामूहिक प्रयत्नांतून कोरोनाविरोधातील लढाई अधिक मजबुतीने लढली जात आहे. आपली लोकसंख्या इतर देशांच्या तुलनेत कितीतरी अधिक आहे. तरी कोरोनाचा आपल्या देशात इतर देशांच्या तुलनेत वेगाने फैलाव होऊ शकला नाही. कोरोनामुळे होणारा मृत्युदरही आपल्या देशात खूपच कमी आहे, मात्र आपले जे नुकसान झाले आहे त्याचे आपल्या सर्वांनाच दुःख आहे, पण जे काही आपण वाचवू शकलो ते निश्चितपणे देशाच्या सामूहिक संकल्पशक्तीचाच परिणाम आहे, असेही त्यांनी सांगितले.

-माय लाइफ  माय योगा कोरोना संकटकाळात योग महत्त्वाचा आहे. कारण हा विषाणू रिस्पायरेटरी सिस्टीमवर परिणाम करतो. योगात रिस्पायरेटरी सिस्टीम मजबूत करण्यासाठी अनेक प्रकारचे प्राणायाम आहेत. त्याचे परिणाम दीर्घकालीन असतात. म्हणूनच तुमच्या जीवनात योगाला प्रोत्साहन देण्यासाठी आयुष मंत्रालयाने माय लाइफ  माय योगा नावाने आंतरराष्ट्रीय व्हिडीओ ब्लॉगवर स्पर्धा सुरू केली आहे. भारतच नव्हे, तर संपूर्ण जगातील लोक या स्पर्धेत भाग घेऊ शकणार आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेळी सांगितले

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply