Breaking News

‘तो’ रक्तबंबाळ झाल्यानंतरही खेळत राहिला

मुंबई : प्रतिनिधी

आयपीएलच्या शेवटच्या मॅचमध्ये रविवारी मुंबईनं चेन्नर्ईला पराभूत केलं. या मॅचमध्ये चेन्नईसाठी ओपनर शेन वॉटसननं 80 रनांची खेळी केली. शेवटच्या ओव्हरमध्ये तो रनआऊट झाला. मॅचनंतर चेन्नईचा ऑफ स्पिनर हरभजन सिंहनं शेन वॉटसनच्या खेळीबद्दल मोठा खुलासा केला. या खुलाशानंतर प्रेक्षक शेन वॉटसनचं कौतुक करताना थकत नाहीत.

बॅटिंग करताना शेन वॉटसनच्या गुडख्यातून रक्तस्राव होत होता… परंतु, त्यानं सहजासहजी पराभव न स्वीकारता शेवटपर्यंत आपल्या टीमसाठी खेळत राहिला… मॅचनंतर शेन वॉटसनच्या पायावर डॉक्टरांनी सहा टाके घातले आहेत, असा खुलासा हरभजन सिंह यानं सोशल मीडियावर केलाय. ’तुम्हाला त्याच्या गुडघ्यावर रक्त दिसतंय का… मॅचनंतर त्याच्या पायावर सहा टाके घातले गेले… डाइव्ह मारताना तो जखमी झाला परंतु, कुणालाही न सांगता त्यानं बॅटींग सुरूच ठेवली’ असं हरभजननं आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटलं. वॉटसननं 59 बॉल्समध्ये आठ चौकार आणि सहा सिक्सर ठोकत 80 रन्स काढले. बॅटिंग करताना रनआऊट होण्यापासून वाचण्याच्या प्रयत्नात त्यानं एक डाइव्ह मारला आणि त्यातच तो जखमी झाला. वॉटसन शेवटच्या ओव्हरमध्ये मैदानातून बाहेर पडला. त्याच्या टीमला केवळ एका रनसाठी पराभव स्वीकारावा लागला.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply