Breaking News

हॅलो! आपण आम्हाला मदत कराल का?

पनवेल : प्रतिनिधी

हॅलो, आपण आम्हाला मदत कराल का? संचारबंदीमुळे घरातील धान्य संपले आहे. आमची उपासमार होत आहे. आपण काही मदत कराल का? फोनवरुन एक महिला पनवेलचे मंडल अधिकारी रोडे यांना विचारत होती. त्यांनी तिची माहिती घेऊन तिला मदत मिळवून दिल्यावर तिने फोन करून त्यांचे खास आभार मानले. पनवेलचे मंडल अधिकारी रोडे यांना त्यांच्या मोबाईलवर एक फोन आला. एक महिला फोनवर बोलत होती. तिने आपण मध्यमवर्गीय कुटुंबातील असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण भागातील असून संचारबंदीमुळे घरातील धान्य संपले आहे. काही मदत मिळेल का, अशी विचारणा केली. मंडळ अधिकारी रोडे यांनी त्यांना पत्ता विचारला त्यांनी चिंचवडीचा पाडा, डोंबिवली पश्चिममध्ये राहत असल्याचे सांगितले. डोंबिवली हे ठाणे जिल्ह्यात येत असल्याने पनवेलमधून काहीच करणे शक्य नसल्याने रोडे यांनी अंबरनाथ येथील तलाठी कांबळे यांचेकडून कल्याण येथील मंडल अधिकारी गायकवाड यांचा फोन नंबर मिळवून कुटुंबाची माहिती दिली. त्यांना मदत करण्याची विनंती केली. त्यादिवशी कल्याणला जिल्हा अधिकार्‍यांचा दौरा असल्याने मंडल अधिकारी गायकवाड दिवसभर व्यस्त होते. पण संध्याकाळी त्यांनी त्या कुटुंबाच्या घरी जाऊन त्यांची भेट घेऊन त्यांना मदत केली.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply