पेण : प्रतिनिधी
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आजपर्यंत आपली जबाबदारी शासनाने घेतली होती. पुढे ही घेतील परंतु पूर्ववत जीवनशैली जगत असताना आपण ही या देशाचे राज्याचे नागरिक म्हणून आपण आपली आरोग्याची खबरदारी बाळगुया, असे आवाहन भाजप जिल्हा चिटणीस बंडू खंडागळे यांनी व्यक्त केले आहे.
आर्थिक चक्र रुळावर आणण्यााठी शासनाला लॉकडाऊनचे नियम काही अंशी शिथिल करावे लागले. परंतु आता आपली जबाबदारी आहे की, आपल्या आरोग्याची खबरदारी घेऊन सोशल डिस्टन्सिंग, तोंडाला मास लावणे, गर्दीच्या ठिकाणी न जाणे, सतत हात धुणे, प्रवास करताना शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. तरच आपण कोरोनाला रोखू शकू, असे मत बंडू खंडागळे यांनी व्यक्त केले आहे.