नगरसेविका राजश्री वावेकर यांचा पाठपुरावा
पनवेल : रामप्रहर वृत्त
नवीन पनवेल सेक्टर 5 येथील नाल्याच्या साफसफाईच्या कामाला शुक्रवारी (दि. 12) सुरुवात करण्यात आली. नगरसेविका राजश्री यांनी यासंदर्भात सिडकोकडे पाठपुरावा केला होता. पनवेलच्या वॉर्ड क्रमांक 16 मधील सेक्टर 5 येथील नाल्यामध्ये बाजूची भिंत व फूटपाथ ढासळून त्या ठिकाणी नाल्यात सर्व माती व सिमेंटचा मालबा जमला होता. या ठिकाण चे नागरिक वारंवार तक्रार करीत होते. या तक्रारींची दखल घेत नगरसेविका राजश्री वावेकर यांनी गुरुवारी सिडको कार्यकारी अभियंत्यांची भेट घेतली व काम त्वरित सुरु करण्यासाठी लेखी पत्राद्वारे निवेदन दिले. या निवेदनाची दखल घेत लगेचच शुक्रवारी (दि. 12) सकाळी नाले सफाईच्या कामास सुरुवात करण्यात आली.