Breaking News

तरुणासाठी आदर्श व्यक्तीमत्त्व अमर पाटील

तरुणांचे प्रेरणा स्थान व राजकारणापेक्षा समाजकारणात विशेष रूची असणार्‍या माजी स्थायी समिती सभापती अमर पाटील यांचा आज वाढदिवस. सामाजिक बांधिलकी हे तत्व त्यांनी सुरूवातीपासून अंगीकारले आहे. समाजकार्याला पुजा मानणार्‍या अमर अरुण पाटील यांचा वाढदिवस हा यावर्षी आरोग्यदायी असणार आहे.

कोरोनारुपी महाभयंकर विषाणूने संपुर्ण जगात थैमान घातले आहे.  रुग्ण आणि मुतांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने संपुर्ण जगाने गुडघे टेकले आहेत. कोरोना महामारीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेकांना संगोपनाचा जटील प्रश्न निर्माण  झाला आहे. अशा संकटकालीन परिस्थितीत कळंबोली शहर व परिसरातील कोणाही व्यक्ती उपाशी राहणार नाही याची काळजी घेताना व जनतेला कोरोनाच्या महामारी विरोधात उभे करताना निराधार, बेघर व गरीब गरजूंची सेवा करत अमर पाटील यांच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविण्यात आले. त्यांनी यावर्षी वाढदिवस साजरा न करता त्या रकमेतून जनतेची सेवा करण्याचा संकल्प केला आहे.

गरिबीची जाण असणारे तरुणांचे प्रेरणास्थान असलेल्या अमर पाटील यांना बालपणीच राजकीय बाळकडू वडील अरुण पाटील यांच्याकडून मिळाले. त्यांचे वडील रोडपाली ग्रुप ग्रामपंचायतीचे  सरपंच असताना खेळीमेळीच्या वातावरणात सर्वांना सोबत घेवून गावाला अनेक सोयी सुविधाने नटविलेे. जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम घेण्याची तयारी या गुणांचे बाळकडू त्यांना लहान वयातच आई-बाबांकडून मिळाले होते. त्यामुळे जीवनातील संघर्षाला तोंड देत असताना त्यांनी कधीही मागे पाहिले नाही. गोरगरिबांची जाण असलेल्या अमर पाटील यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना गुरूस्थानी माणून राजकारणात अगदी अल्पवधीत मोठी भरारी घेतली. ऑक्टोबर 2016 रोजी प्रथमच अस्तित्वात आलेल्या पनवेल महानगरपालिका निवडणुकीत नेत्रदिपक यश मिळवून स्वकीया बरोबर विरोधकांना चारीमंड्या चित करत पहिल्या पनवेल महनगरपालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी विराजमान होण्याचा बहुमुल्य मान मिळविला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांचा वरदहस्त व सभागृह नेते परेश ठाकूर यांचे मोलाचे सहकार्य मिळाल्याने ते  यशस्वी होत आहेत. या धुरंदर नेत्यांनी त्यांच्यावर टाकलेला विश्वास सार्थ करताना व आपल्या सर्व सहकार्‍यांसोबत घेवून अनेक जनतेच्या विकासाचे म्हत्वपुर्ण निर्णय घेतले. लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांचा सहवास अमर पाटील यांना अतभुत प्रेरणादायी असा आहे.

राजकारणापेक्षा समाजकारणात रुची असलेल्या अमर पाटील यांनी स्थायी समितीच्या अध्यक्षपदी विराजमान होताच पालिकेत समाविष्ठ केलेल्या दुर्मिक्ष असलेला गावांचा विकास करताना 29 गावांच्यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतुद करण्याचा धाडसी निर्णय घेतला. पालिकेत समाविष्ठ करण्यात आलेल्या गावांचा टप्प्याटप्याने विकास करताना त्यांनी सुरुवातीला धानसर, कोयनावेळ, करवले आणि रोडपाली ही गावे स्मार्ट बनविण्यासाठी 46 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेतला. त्यात त्यांनी मुलभुत सुविधापासून अगदी स्मार्ट सुविधा देण्याचा निर्णय घेतला. रोडपाली गाव स्मार्ट बनविण्यासाठी 13 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. त्यात सुसज्य रस्ते, पाणीपुरवठा योजना, दिवाबत्ती व्यवस्था, सार्वजनिक शौचालय, व्यायाम शाळा, विद्युत वाहिनी भुमिगत करणे यासारख्या सुविधा देण्यात येतील. विकासाचा ध्यास घेतलेल्या अमर पाटील यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनातून प्रभाग क्रमांक 7 साठी तीन कोटी 41 लाख रुपयांचा निधी मंजूर करून त्यात सेक्टर 16, 17 व 20 मधील गेली अनेक वर्षांपासूनचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकालात काढताना नवीन पाईप लाईन टाकण्यात आली. सेक्टर 2ई  एमआरबी ते सेक्टर 10 एमआरबी 2.9 किमी अंतरावर 600 मीमी व्यासाची पाईपलाईन टाकण्यात आली.

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने रोडपाली, खिडुकपाडा येथील नवीन शौचालय बांधकामासाठी 70 लाखांचा निधी मंजूर करण्यात येवून ते ती वापरात आली आहेत. सेक्टर 20 प्लाट नं 26 मध्ये अद्ययावत उद्यानासाठी 50 लाख रुपये निधी मंजूर करण्यात येवून त्याचे काम सुरू असून ते लवकरच पुर्णवत आहे. रोडपाली गावात 35 लाख खर्चून व खिडुकपाडा गावात 32 लाख खर्चून अद्ययावत अशी शौचालये बांधण्यात आली आहेत. अमर पाटील यांच्या प्रयत्नातून रोडपाली स्मशानभूमीसाठी 75 लाख निधी मंजूर करण्यात आले असून त्याचे काम लवकरच सुरू होत आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अमर पाटील यांनी मोठ्या प्रमाणात विकासाला चालना देवून जनतेच्या विकासाची कामे केली आहेत. त्यामुळे ऐन तारुण्यात त्यांनी जनतेच्या हदयात ठाण मांडले आहे.

कोरोनाच्या महामारीत योद्धासारखे लढत प्रथम त्यांनी कोरोना विषाणूचा संसर्ग तोडण्यासाठी कळंबोली शहर, रोडपाली व खिडूकपाडा गावात औषध फवारणी करून निर्जंतुकीकरण करवून घेतले. देशाच्या टाळेबंदीत कोणीही व्यक्ती उपाशी राहू नये म्हणून त्यांच्या माध्यमातून 250 आदिवासी लोकांना धान्य व जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले. बेघर, निराधार, गरीब गरजूंवर उपासमारीची पाळी येवू नये म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने अमर पाटील यांच्या माध्यमातून 25 मार्च ते 29 मे दरम्यान मोदी भोजन कम्युनिटी किचन मार्फत रोज 1000 गरजू नागरिकांना मोफत जेवण वाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. 1265 गरीब व गरजू नागरिकांना धान्य वाटप केले.

 सतत पक्षासाठी काम करणार्‍या कार्यकर्त्यांना एका महिन्याचे जीवनावश्यक वस्तू वाटप केले. कळंबोली शहर, रोडपाली गाव, बौद्धवाडा व खिडुकपाडा गावातील 7400 घरात अर्सेनिक अल्बम 30 औषधाचे  वाटप करत कोरोना विरोधात लढण्यास उभे केले. कोरोनाच्या महामारी दरम्यान रक्त तुटवडा भरुन काढण्यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त युवकांनी सहभाग घेवून रक्तदान करावे यासाठी खुप मेहनत घेत 57 रक्तदात्यांनी रक्तदान केले. कळंबोलीतील सर्व सफाई कामगार, धूर व औषध फवारणी कामगार यांना फेस शिल्डचे वाटप करण्यात आले.

कोरोनाने थैमान घातले असून दिवसेंदिवस वाढत्या कोरोना रुग्णाने चिंतेचे वातावरण आहे. अशा भयानक परिस्थितीत आपला जीव धोक्यात घालून प्रशासनाच्या मदतीने कळंबोली शहर, रोडपाली व खिडुकपाडा गावात कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी  प्रयत्न करत करीत असलेल्या योद्धाचा आज वाढदिवस असून तो साजरा न करता हा पैसा गरीब, निराधार गरजू लोकांसाठी वापरण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. जनतेच्या सेवेत सूख पाहिलेल्या अमर पाटील आपणास पुढील सामाजिक, राजकीय वाटचाल अधिकच प्रकाशमय व जनतेच्या सेवेसाठी जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

– विकास पाटील

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply