Breaking News

नव्या शैक्षणिक वर्षाबाबत विद्यार्थ्यांसह पालकांत संभ्रम

पेण ः प्रतिनिधी

एकीकडे कोरोनाचे महासंकट त्यात निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा आणि आर्थिक मंदी असताना खासगी शाळांने शिक्षणाचे ऑनलाइन धोरण स्वीकारत नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात केली आहे. शाळा कधी सुरू होईल हे माहीत नाही. मुलांना वर्गात कधी बसता येईल हेही माहीत नाही, परंतु पेण तालुक्यात खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेने आपल्या शैक्षणिक वर्षाचा महत्त्वाचा भाग असलेले पाठ्यपुस्तक विद्यार्थ्यांच्या हाती दिले आहे. परिणामी पेण तालुक्यात नव्या शैक्षणिक वर्षाबाबत मुलांप्रमाणे पालकांतही संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाले. या शैक्षणिक वर्षातील महत्त्वाचा घटक शाळेची फी आहे. ऑनलाइन शिक्षण सुरू झाले म्हणजे फी किती असेल, आधी जाहीर केली तेवढीच असेल का, असे अनेक प्रश्न पालकांसमोर उभे आहेत. कोरोना तसेच निसर्ग चक्रीवादळामुळे लोकांचे कंबरडे मोडले आहे. घरावरील छप्पर उडाले. अनेकांचे अतोनात नुकसान झाले. अशा अवस्थेत मुलांची फी कशी भरणार, असा प्रश्न पालकांना सतावत आहे.

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply