
मुंबई : प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या 54 व्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिवसेनेच्या राज्यभरातील पदाधिकार्यांना संबोधित केले. यावेळी शिवसैनिकांना संबोधित करताना भविष्यात शिवसैनिकाला पंतप्रधानही बनवणार असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी केला असल्याचे सांगितले. मात्र उद्धव ठाकरेंच्या या विधानावर भाजपाचे नेते नितेश राणे टोला लगावला आहे. पहिले पुढचा शिवसेनेचा मुंबईचा महापौर बसवा, पतंप्रधान तर लांबच राहिले, असं ट्विट करत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.