पनवेल : रामप्रहर वृत्त
सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा बिभवी या शाळेच्या विकासासाठी दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी तब्बल दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली असून या मदतसह धनादेश शुक्रवारी (दि. 25) सुपूर्द करण्यात आला.
या वेळी बिभवी शाळेच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला. सत्कारावेळी शाळेचे मुख्याध्यापक अशोक लकडे, गणपत जाधव, लक्ष्मण दुंदळे, दत्तात्रय जाधव, ज्ञानदेव नवले, नामदेव बांदल, प्रभाकर जाधव, प्रकाश जाधव, राजेंद्र जाधव, अरुण साळुंखे, सूरज जाधव, गणेश नवले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. याच कार्यक्रमात, शाळेला विकास निधी मिळवून देण्यासाठी अत्यंत मोलाचे कार्य केल्याबद्दल बिभवी गावचे सुपुत्र सुरज प्रकाश जाधव यांचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याहस्ते हस्ते सत्कार करण्यात आला. या निधीमुळे बिभवी शाळेच्या शैक्षणिक प्रगतीला नवी दिशा मिळणार आहे.
Check Also
दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार
रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …
RamPrahar – The Panvel Daily Paper