Breaking News

रायगडात नवा उच्चांक; 128 रुग्ण पॉझिटिव्ह

पनवेल ः रायगड जिल्ह्यात शनिवारी 128 नवीन रुग्ण आढळले असून, दोघांचा मृत्यू, तर 56 रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रात 73, ग्रामीणमध्ये 16, अलिबाग 12, पोलादपूर आठ, उरण पाच, कर्जत सात, महाड पाच आणि पेणमध्ये दोन रुग्ण आढळले. पनवेल महापालिका क्षेत्रात दोन व्यक्तींचा मृत्यू झाला. रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची एकूण संख्या 2296 झाली असून 96 जणांचा मृत्यू झाला. रायगड जिल्ह्यात 1551 जणांनी कोरोनावर मात केली. पनवेल तालुक्यात 89 नवीन रुग्ण आढळले. कळंबोली खिडूकपाडा प्लॉट नंबर 1546 येथील 25 वर्षीय व नावडे येथील 50 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. जिल्ह्यात शनिवारपर्यंत 6382 टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी 2296 पॉझिटिव्ह आल्या आहेत. 19 टेस्टचे रिपोर्ट अद्याप बाकी आहेत. 649 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply