Breaking News

पांड्या ऑन फायर!; 20 षटकारांसह ठोकले दीडशतक

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

भारतीय संघाचा तडाखेबाज अष्टपैलू फलंदाज हार्दिक पांड्या नुकतीच 37 चेंडूंत शतकी खेळी केल्याने चर्चेत आला होता. ही चर्चा थांबण्याआधी पांड्याने एक नवा पराक्रम केला. त्याने डॉ. डी. वाय. पाटील टी-20 स्पर्धेत रिलायन्स वन संघाकडून खेळताना 55 चेंडूंत नाबाद 158 धावांची खेळी केली. दुखापतीमुळे पांड्या गेले कित्येक महिने क्रिकेटपासून दूर होता, पण क्रिकेटच्या मैदानात त्याने डॉ. डी. वाय. पाटील टी-20 स्पर्धेच्या माध्यमातून पुनरागमन केले. तेव्हापासून तो गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. रिलायन्स वन विरूद्ध बीपीसीएल सामन्यात पांड्याने नाबाद दीडशतकी खेळी केली. या खेळीत त्यांने 20 उत्तुंग षटकार खेचले. त्याच्या दमदार खेळीच्या बळावर रिलायन्स वनने 4 बाद 238 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना बीपीसीएल संघाचा डाव 134 धावांत आटोपला आणि रिलायन्स वनने सामना 104 धावांनी जिंकला.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply