Breaking News

शिक्षकांकडून उरणमध्ये अन्नधान्य, चटईचे वाटप

उरण : वार्ताहर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उरण तालुक्यातील गरजू बांधवाना मदतीचा हात म्हणून अन्नधान्याबरोबर, चादर, चटईचे वाटप आणि विविध झाडांचे वृक्षारोपण केलेे. एकप्रकारे सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे महान काम शिक्षकांनी हाती घेतल्याने सीमा शुल्क विभागाचे अधिकारी महेंद्र भोईर, रमेश रहाटेसह अनेक जेष्ठ नागरिकांनी त्यांचे कौतुक केले आहे.

कोरोनाच्या संकटात राज्यातील जनता आपले जीवन जगत असताना त्या जनतेला आर्थिक मदतीचा आधार  म्हणून सामाजिक बांधिलकी जपत उरण तालुक्यातील शिक्षक जेष्ठ नेते तथा शिक्षक सेना पँनल प्रमुख नरेश मोकाशी यांनी आपल्या पगारातील 25 हजारांचा धनादेश तसेच शिक्षक सेना जिल्हाप्रमुख निर्भय म्हात्रे यांनी आपल्या आईच्या आठवणीना उजाळा देत आपल्या पगारातील 11 हजार 111 रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केला आहे.

तसेच आपले सहकारी शिक्षक नेते बबन पाटील, बी. जे. म्हात्रे, हि. सो. म्हात्रे, का. रा. म्हात्रे, रमनिक पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली सीमा शुल्क विभागाचे अधिकारी महेंद्र भोईर यांच्या उपस्थितीत गरजवंताना मोलमजुरी करणार्‍या बांधवांना अन्नधान्या बरोबर चादर, चटईचे वाटप तसेच वृक्षारोपण करण्याचे कार्य हाती घेतले आहे. या वेळी सीमा शुल्क विभागाचे निवृत्त वरिष्ठ अधिकारी रमेश रहाटे, जगदीश रहाणे, जी. जे. चव्हाण, प्रदिप मोरे, रविंद्र भोईर, अविनाश म्हात्रे, विजय भोईर, लाखन पाटील यांनी शिक्षकांच्या कार्याबद्दल त्यांचे कौतुक केले.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply