लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या उलवे येथील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालय आणि सीबीएससी विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ रविवारी (दि. 22) आयोजित करण्यात आला होता. हा समारंभ रयतचे मॅनेजिंग कौंन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि रयतचे माध्यामिक विभागाचे सदसचिव राजेंद्र साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
यावेळी विद्यार्थ्यांनी भारतीय उत्सव या विषयावर विविध प्रकारात आपले नृत्याविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. याचबरोबर शिक्षकांनीदेखील नृत्याद्वारे आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक वर्ष 2022-23मधील गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन त्यांचा गुणगौरव केला आणि आणि विद्यालयाचा वार्षिक अहवालाचे प्रकाशन केले.
या समारंभाला रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॅडी सदस्य वाय.टी. देशमुख, भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष तथा जनरल बॅडी सदस्य अरुणशेठ भगत जनरल, महेंद्र घरत, सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालय मराठी माध्यामचे चेअरमन शरद खारकर, सीबीएससी विद्यालयालयाचे चेअरमन परेश ठाकूर, स्कूल कमिटी सदस्य निलेश खारकर, कविता खारकर, छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका साधना खटावकर, सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालय मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सुजाता बल्लाळ, सौ.शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयाच्या प्राचार्या मुक्ता खटावकर यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता फटाक्यांची आतषबाजी करून झाली.