Breaking News

उरण बाजारपेठेत नागरिकांची गर्दीच गर्दी; कोरोना प्रत्येक गावाच्या वेशीपर्यंत पोहचण्याची शक्यता

उरण : प्रतिनिधी

उरण तालुक्यात कोरोना संसर्गजन्य विषाणूच्या व्हायरसचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा अधिक प्रमाणात वाढत असताना मात्र उरण शहरातील बाजारपेठेत दररोज लहान-सहान वाहने आणि काही नागरिकांचा चक्काजाम होत आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्याची मार्गावर असताना तालुक्यातील गावोगावी कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे.

मात्र याचे गांभिर्य घेत नसलेले नागरिक व महिला उरण तालुका जणू काही कोरोना मुक्तच झालाय, असे गृहीत धरून सुरक्षित अंतराचा फज्जा उडवत कोणत्या ना कोणत्या कामाचे निमित्त घेऊन बाजारपेठेत प्रचंड गर्दी करीत आहेत. याला जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण होत असून, पोलीस, महसूल आणि अन्य प्रशासनही कोरोनाच्या संकटातून जनतेला बाहेर काढण्यासाठी मागील तीन महिने अहोरात्र झटत होते. आजही प्रयत्नांची पराकाष्ठा सुरूच आहे.

कोणत्याही प्रकारे सोयर सुतक नसलेल्या बेफिकीर नागरिकांना आवरणे आत्ता मुश्कील झाले आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी कित्येक दिवस राबणार्‍या पोलीस, महसूल, आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी यांनी स्वतःच्या कुटुंबाकडे लक्ष न देता समाजातील नागरिकांसाठी आपले कर्तव्य बाजावण्याचे काम

चोखपणे करीत आहेत.

मात्र मोकाट फिरणार्‍या नागरिकांनी त्याची कदर आजपर्यंत केलीच नाही. सर्व सुविधा वेळेतच मिळाल्या पाहिजे त्यासाठी कोणत्याही वेळी घराबाहेर पडून, बाजारपेठेत गर्दी करायची यापेक्षा गांभीर्याने घेणार्‍यांची संख्या फार काम असून, काही नागरिक मास्कही वापरत नसल्याचे चित्र दिसू लागले आहे. त्यामुळे कोरोना काही दिवसातच कोरोना प्रत्येक गावाच्या वेशीपर्यंत पोहचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply