अलिबाग ः प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी चक्रीवादळग्रस्तांच्या नुकसानीचे चुकीच्या पद्धतीने पंचनामे करण्यात आले आहेत तसेच चुकीच्या लोकांना मदत निधी दिला गेल्याची कबुली म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी मंगळवारी
(दि. 1) येथे दिली. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पंचनामे व मदत वाटपात झालेला प्रकार जिल्हाधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिला आहे. त्यांनी माहिती घेऊन तो निधी परत घेतला जाईल, असे आश्वासन दिल्याचेही घोसाळकर यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, समीर शेडगे, प्रमोद घोसाळकर, जिल्हाप्रमुख अनिल नवगणे आदी घोसाळकर यांच्यासोबत होते.
मी दोन वेळा रायगड जिल्ह्याचा दौरा करून निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली आहे. त्याचप्रमाणे आज जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची भेट घेऊन मदतनिधी वाटपाच्या कामाची माहिती घेतली, परंतु निधी वाटपाचे काम मंद गतीने होत असल्याचे घोसाळकर यांनी या वेळी सांगितले.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …