Breaking News

रायगडात 266 नवे रुग्ण; पनवेलमध्ये लॉकडाऊन जाहीर

पनवेल : रायगड जिल्ह्यात बुधवारी (दि. 1) कोरोनाच्या तब्बल 266 रुग्णांची नोंद झाली. नव्या रुग्णांमध्ये पनवेल महापालिका हद्दीतील 136, पनवेल ग्रामीणमधील 31, पेण तालुक्यातील 20, रोहा 19, उरण, खालापूर व माणगाव तालुक्यातील प्रत्येकी 15, कर्जत नऊ, श्रीवर्धन तीन, सुधागड दोन आणि तळा तालुक्यातील एकाचा समावेश आहे. सुदैवाने दिवसभरात एकाचाही मृत्यू झाला नाही तसेच 111 जण बरे झाले. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा चार हजारांवर जाऊन 4212 एवढा झाला असून, मृतांची संख्या 134 इतकी कायम आहे. दरम्यान, पनवेल मनपा हद्दीत रुग्ण वाढत असल्याने 3 जुलैच्या रात्री 9पासून 13 जुलै रात्री 12पर्यंत 10 दिवस कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या संदर्भात सभागृह नेते परेश ठाकूर व सहकार्‍यांनी मागणी केली होती. 

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply