Breaking News

नुकसानग्रस्त वारदोली, बेलवली परिसराची आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून पाहणी

ग्रामस्थांशी साधला संवाद; शासकीय मदत मिळवून देण्याची ग्वाही

पनवेल ः प्रतिनिधी  
निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात मोठी हानी झाली. याचा मोठा फटका पनवेललाही बसला. या पार्श्वभूमीवर भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष कार्यक्षम आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी (दि. 6) वारदोली, बेलवली परिसरातील वाड्या-वस्त्यांना भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांना दिलासा दिला. या वेळी त्यांनी लवकरात लवकर संबंधित वादळग्रस्तांना शासकीय मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली.
त्यांच्या समवेत भाजपचे तालुका मंडल सरचिटणीस राजेंद्र पाटील, विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, युवा मोर्चाचे तालुका मंडल अध्यक्ष आनंद ढवळे, सरपंच बबन पवार, माजी सरपंच जगदिश ढवळे, आप्पा भागीत, संदेश पाटील, जितू बताले, नारायण भोपी, सागर फडके, जगदिश केंगे, नामदेव भूतांबरा आदी उपस्थित होते. वारदोली, हालटेप ठाकूरवाडी, बेलवली, तारटेप ठाकूरवाडी आदी ठिकाणी पाहणी करण्यात आली. दरम्यान, आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी नेरे आणि शिरवली परिसरातील आदिवासी वाड्या व पाड्यांमध्ये भेट देऊन पाहणी करून नागरिकांना दिलासा दिला.
निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यातील लाखो घरांचे नुकसान झाले. पनवेल तालुक्यासही निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसला. दोन हजार घरांची पडझड झाली. 225 एकर शेतीचे नुकसान झाले. दीड हजारांच्या आसपास झाडे उन्मळून पडली. सुदैवाने तालुक्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. आदिवासी वाड्या-पाड्यांवर मोठे नुकसान झाले आहे.

Check Also

सरके चुनर… हटाव मोहीम सफल

गाणं कोणतेही का असेना ते लिहिताना, स्वरबद्ध करताना, त्यावर संगीतसाज चढवताना, त्याचे चित्रीकरण करताना, त्यावरची …

Leave a Reply