उरण : वार्ताहर
लायन्स क्लब ऑफ उरणच्या वतीने उरण एसटी बस स्थानकात मंगळवारी (दि.30) हिरकणी कक्ष केंद्राची निर्मिती केली आहे. एसटी बस स्थानकात मातांना आपल्या बाळांना स्तनपान करण्यासाठी हिरकणी कक्ष अर्थात स्तनपान केंद्राची निर्मिती केली आहे. या कक्षाचे उद्घाटन उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांचे हस्ते करण्यात आले.
या वेळी लायन्स क्लब ऑफ उरणचे अध्यक्ष लायन डॉ. अमोल गिरी, सेक्रेटरी लायन समीर तेलेंगे, खजिनदार लायन संध्याराणी ओहोळ, लायन सदानंद गायकवाड, लायन चंद्रकांत ठक्कर, लायन अॅड. दत्तात्रेय नवाळे, लायन डॉ. संतोष गाडे, लायन संजीव अग्रवाल, लायन नरेंद्र ठाकूर, लायन साहेबराव ओहोळ, लायन डॉ. प्रीती गाडे, लायन अमरीन मुकरी, नगरसेविका दमयंती म्हात्रे, लायन संपूर्णा थळी, वैभव म्हात्रे, उरण बस आगार व्यवस्थापक सतीश मालचे, वाहतूक निरीक्षक एस. के. म्हात्रे, वरिष्ठ लिपिक शशी कोळी आदी उपस्थित होते.