नवी दिल्ली : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने शुक्रवारी रात्री 36 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यात महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे. जळगावमधून स्मिता वाघ, नांदेडमधून प्रताप चिखलीकर, दिंडोरीतून डॉ. भारती पवार, पुण्यातून गिरीश बापट, बारामतीतून कांचन कुल आणि सोलापूरमधून डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने गुरुवारी पहिली यादी जाहीर केली होती. पहिल्या यादीत 184 उमेदवारांचा समावेश होता; तर शुक्रवारी रात्री 36 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, आसाम आणि मेघालय या राज्यांचा समावेश आहे.
दरम्यान, काँग्रेसनेही 35 उमेदवारांची यादी जाहीर केली असून, त्यात महाराष्ट्रातील पाच उमेदवारांचा समावेश आहे. काँग्रेसनेही काही जागी नवे उमेदवार दिले आहेत.