Monday , June 5 2023
Breaking News

तटकरेंवर भरवसा नाही, नाईलाज म्हणून पाठिंबा

मधुकर ठाकूर यांनी स्पष्ट केली भूमिका

अलिबाग : प्रतिनिधी

सुनील तटकरे यांच्यावर भरवसा नाही, परंतु पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेस हा आमचा सहकारी पक्ष असल्याने काळजावर दगड ठेवून नाईलाजास्तव तटकरेंना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, असे काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी शनिवारी (दि. 23) येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांना पाठिंबा द्यायचा की नाही यावर विचारविनिमय करण्यासाठी अलिबाग-मुरूड विधानसभा मतदारसंघातील काँगे्रस कार्यकर्त्यांची सभा शनिवारी अलिबाग येथील बॅ. ए. आर. अंतुले भवनात आयोजित करण्यात आली होती. या सभेत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ठाकूर बोलत होते.

मधुकर ठाकूर म्हणाले की, निवडून आल्यास सुनील तटकरे काय करतील हे आम्हाला माहीत नाही. त्यांच्यावर आमचा विश्वास नाही. आम्हाला त्यांचा चांगला अनुभव आहे. तटकरेंना पाठिंबा दिल्यामुळे आमच्या पक्षाचे नुकसानदेखील होणार आहे, परंतु राहुल गांधी यांच्यासाठी काँग्रेस व मित्रपक्षांची एक-एक जागा महत्त्वाची आहे. आपल्या मित्रपक्षांच्या उमेदवारांचा प्रचार करा, असे आदेश पक्षश्रेष्ठींनी दिले आहेत. एवढ्यासाठीच नाईलाज म्हण्ाून आम्ही तटकरेंना पाठिंबा देत आहोत. नंतर तटकरेंनी बेर्ईमानी केली; तर त्याला आम्ही काहीच करू शकत नाही, असेही ठाकूर यांनी नमूद केले.

सुनील तटकरे घरी आले तसे शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील तुम्हाला भेटायला घरी आले तर काय कराल, या प्रश्नाला उत्तर देताना मधुकर ठाकूर यांनी स्पष्ट केले की, आपल्या घरी कुणीही आले तरी त्याचा अपमान करायचा नाही हे आमचे तत्त्व आहे. आमचे आणि जयंत पाटील यांचे तात्त्विक मतभेद आहेत, परंतु ते मला भेटण्यासाठी घरी आले तर त्यांचे चहापाणी देऊन स्वागत करू, मात्र मिठी मारणार नाही.

विधानसभा निवडणूक लढवणारच!

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत शेकाप आहे, म्हणून आम्ही विधानसभा निवडणुकीत शेकापबरोबर असू असे नाही. काही झाले तरी अलिबाग विधानसभा निवडणूक आम्ही लढवणारच. आमच्या घरातलाच उमेदवार असेल. जर घरातली व्यक्ती निवडणूक लढवण्यास तयार नसेल; तर शेवटचा पर्याय म्हणून मी निवडणूक लढवेन, असे मधुकर ठाकूर यांनी या वेळी जाहीर केले.

Check Also

खारघरमध्ये बास्केटबॉल स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती खारघर ः प्रतिनिधी खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने माजी खासदार …

Leave a Reply