खोपोली प्रतिनिधी:
मुंबई पुणे दृतगती महामार्गावर खोपोली हद्दीत मुंबईला मुंबईला जाणाऱ्या खाजगी बसला अपघात होऊन यात सहचालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बसमधील विद्यार्थ्यांना किरकोळ जखमा असून त्यांना नगरपरिषद रुग्णालयात उपचार करण्यात आले. सदरचा अपघात मेळ गावाच्या हद्दीत बुधवार सकाळी सातच्या दरम्यान घडला. सर्व विद्यार्थी सुखरूप असल्याचे सांगण्यात आले.
मुंबई पुणे द्रतगती महामार्गावर खोपोली हद्दीत मेळ गावाच्या हद्दीत बुलढाण्याहून आलेल्या खाजगी बसचा ब्रेक निकामी झाल्याने अपघात घडला. अपघात होतात सर्व शासकीय यंत्रणा त्याचप्रमाणे अपघात ग्रस्त मदतीसाठी चा ग्रुपने घटनास्थळी येऊन मदत कार्य केले. यातील जखमींना रुग्णवाहिकेतून नगरपरिषद रुग्णाला उपचारासाठी आणण्यात आले तर उर्वरित विद्यार्थ्यांना गगनगिरी आश्रम मध्ये नेण्यात आले. दरम्यान या अपघातात सहचालक राहुल साहेबराव सुरवसे (रा. चिखली, बुलढाणा) हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. उर्वरित सर्व विद्यार्थी व शिक्षकांना येथील गगनगिरी आश्रमाच्या सभागृहात हलवण्यात आले. सदरची बस मंगळवार सायंकाळी बुलढाण्याहून मुंबईकडे येत असताना खोपोली हद्दीत हा अपघात झाला. चिखली बुलढाणा येथील कर्मवीर भाऊसाहेब बोंडरे या संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची सहल मुंबईकडे निघाली होती. खालापूर तालुक्यातील महाड येथे श्री वरदविनायकाचे दर्शन घेऊन त्यानंतर रायगड दर्शनासाठी विद्यार्थी जाणार होते तत्पूर्वीस खोपोलीय हद्दीत मेळ गावाच्य हा अपघात झाला.
Check Also
खारघरच्या रामशेठ ठाकूर महाविद्यालयाला ’नॅक’ची ए श्रेणी प्राप्त
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर …