Breaking News

माणगाव पोलीस ठाण्यात झाला कोरोनाचा शिरकाव

अधिकारी व कर्मचार्‍याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

माणगाव : प्रतिनिधी – माणगाव पोलीस ठाण्यात कोरोनाने शिरकाव केला असून, येथील एका अधिकार्‍याचा व एका कर्मचार्‍याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने पोलीसवाले धास्तावले आहेत.

माणगावमध्ये एका पोलीस अधिकार्‍याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या अगोदर एका पोलीस कर्मचार्‍याला कोरोना झालेला आहे. उपजिल्हा रुग्णालय, तहसील कार्यालयापाठोपाठ आता पोलीस ठाण्यात कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.त्यामुळे सार्‍यांचेच टेन्शन वाढले आहे.

दरम्यान, सोमवारी तालुक्यात माणगाव, विहुळे, इंदापूर व मोर्बा प्रत्येकी एक अशा चार जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून, सात जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती माणगाव उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप इंगोले यांनी दिली.

माणगाव तालुक्यात आतापर्यंत कोरोनाचे एकूण 133 रुग्ण आढळून आले असून, यापैकी 69 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत. त्यामुळे तालुक्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 60 आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगावी तसेच सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रांताधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर यांनी केले आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply