पनवेल : रायगड जिल्ह्यात कोरोनामुळे आठ जणांच्या मृत्यूची नोंद बुधवारी (दि. 8) झाली असून, 273 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. मृतांमध्ये पनवेल महापालिका हद्दीतील तीन, खालापूर व पेण प्रत्येकी दोन आणि उरण तालुक्यातील एकाचा समावेश आहे, तर नवे रुग्ण पनवेल मनपा हद्दीत 93, पनवेल ग्रामीण 31, पेण तालुक्यात 38, कर्जत 25, खालापूर 24, उरण 22, माणगाव 10, रोहा व महाडमध्ये प्रत्येकी नऊ, अलिबाग सात, श्रीवर्धन दोन आणि मुरूड, तळा व पोलादपूर तालुक्यात प्रत्येकी एक असे आहेत. दुसरीकडे दिवसभरात 191 रुग्ण बरे झाले. दरम्यान, जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा सहा हजारांच्या वर जाऊन 6057 एवढा झाला असून, मृतांची संख्या 178 झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 3498 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने सध्या 2430 सक्रिय रुग्ण आहेत.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …