Breaking News

सर्वांना भाजपचे आकर्षण; उलवे नोडमधील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल ः रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पक्षाची क्रेझ आजही कायम असून उलवे नोडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उत्तर भारतीय कार्यकर्त्यांनी शनिवारी (दि. 30) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजप बिहार प्रकोष्ठ प्रदेशाध्यक्ष फुल सिंग, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र तिवारी, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, सुधीर ठाकूर, वसंतशेठ पाटील, युवा नेते निलेश खारकर, आशिष घरत, विशाल म्हात्रे, गणपत हेगडकर, स्वप्नील म्हात्रे आदी उपस्थित होते. या वेळी उलवे नोड सेक्टर 18, 19मधील अवधेश महातो, बबिता रमेश शर्मा, मुन्ना शर्मा, रमेश शर्मा, राहुल चौधरी, महेशचंद दिवाकर, लवकुश कुमार, माणिकचंद वर्मा, संजीव चौधरी, रवी कुमार, व्ही. करपय्या, वीरेंद्र राऊळ, रोहित कुमार, अशोक कुमार, संचित चौधरी, प्रवीण कुमार, संदीप प्रसाद, दीपक रावत, विजय रावत, रवी कुमार, सुजीत कुमार, विमल नेगी, गौतम रावत, सोनू यादव, अर्जुन मदेशिया, विकास यादव या राष्ट्रवादीच्या उत्तर भारतीय कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला.

Check Also

मुंबईजवळ समुद्रात बोट बुडून 13 जणांचा मृत्यू; 101 जणांना वाचवले

मुंबई : प्रतिनिधी मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी (दि.18) सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली. …

Leave a Reply