Breaking News

कुख्यात गुंड विकास दुबेचा यूपीत एन्काऊंटर

दोन पोलीस कर्मचारीही जखमी

लखनऊ : वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशातील आठ पोलिसांची हत्या करणार्‍या कुख्यात गुंड विकास दुबे याचा शुक्रवारी (दि. 10) सकाळी विशेष पोलीस पथकाने एन्काऊंटर केला. अपघातानंतर पळून जात असताना पोलिसांनी त्याचा खात्मा केला.
मध्य प्रदेशमध्ये अटक केल्यानंतर पोलीस पथक दुबेला कानपूरला घेऊन येत असताना पोलिसांच्या ताफ्यातील एका वाहनाचा अपघात झाला. यानंतर दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला तसेच पोलिसांचे शस्त्र घेऊन गोळीबार करण्यास सुरुवात केली. या वेळी पोलिसांनी त्याला आत्मसमर्पण करण्यास सांगितले, पण त्याने माघार घेतली नाही. पोलिसांच्या गोळीबारात दुबे ठार झाला. या चकमकीत दोन पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत.
पोलिसांनी रुग्णालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, विकास दुबेने अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्न केला. या वेळी झालेल्या चकमकीत दुबे जखमी झाला होता. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्याचा मृत्यू झाला.
यापूर्वी उत्तर प्रदेश पोलीस 3 जुलै रोजी विकास दुबेला अटक करण्यासाठी कानपूर येथे गेले असता, त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. यात आठ पोलीस कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला. तेव्हापासून दुबे फरार होता.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply