Breaking News

अवजड वाहन पलटल्याने वाहतुकीची कोंडी

मोहोपाडा : प्रतिनिधी – पातालगंगा औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कारखानदारी असल्याने अवजड वाहनांची रेलचेल सुरुच असते. न्हावाशेवा येथून अवजड वाहन (क्र. एमएच 43 यू 6776) पाताळगंगा या परिसरात येत असताना पौध येथे येताच वळण घेत असताना वाहन चालकाचे वहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या बाजूला झुकून पलटी झाले. सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. मात्र हे अवजड वाहन रस्त्याच्या बाजूला झुकल्यामुळे काही तास वाहतुकीची कोंडी  झाल्याने वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्याचे दिसून आले.

पावसाळ्यात अपघातांची समस्या गंभीर बनत असते. त्यातच रस्त्याची साईट पट्टीही खचत असते. यामुळे पावसाळ्यात वाहन चालविताना काळजीपूर्वक चालवावी. ओव्हरटेक, ओव्हर लोड टाळा अशा अनेक सुचना वहान चालकांस देत असतात. मात्र कमी वेळात जास्त माल कसा जाईल या विचारांतून वाहन चालक अतिशय वेगाने वाहन चालवित असतात. परिणामी अपघातला सामोरे जावे लागत आहे.

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जमीन ओलसर झाल्यामुळे वाहन घसरण्याचे प्रमाण वाढले यामुळे वाहन चालविताना स्वत:च्या जीवा समवेत आपण दुसर्‍याचा जीव धोक्यात घालत आहे. रस्त्यावर प्रत्येकांनी वाहन काळजी पुर्वक चालवा, असे विविध ठिकाणी बोर्ड लावले गेले आहे. मात्र वाहनचालक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. या मार्गावरील रस्त्याचे डांबरीकरण गेल्या वर्षी झाल्यामुळे रस्त्याची स्थिती उत्तम आहे. यामुळे वाहनांचा वेग वाढला असून अपघाताचे प्रणाण ही वाढले जावू शकते. असे असले तरी सुद्धा या मार्गावर अपघात किंवा वाहन पलटी झाल्यास वाहतुकीची कोंडी निर्माण होत असते.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply