Breaking News

जेएसडब्ल्यू कंपनीत रस्ता सुरक्षा अभियान

पेण : प्रतिनिधी

येथील प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि रायगड वाहतूक शाखा यांच्या माध्यमातून आणिच जेएसडब्ल्यू स्टील कंपनीच्या सहकार्याने कंपनीमध्ये नुकतेच रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आले. यावेळी नेत्रचिकित्सा शिबिरही घेण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश वर्‍हाडे यांनी सुरक्षा अभियानाचा हेतू विषद केला. वाहन चालकाने आपली आणि प्रवाशांची काळजी कशा प्रकारे घेतली पाहिजे, याबाबत अलिबाग येथील जेएसएम कॉलेज तर्फे मार्गदर्शनपर पथनाट्य सादर करण्यात आले. यावेळी सदर अभियानाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने उपस्थितांना वाहतुकीच्या नियमांबाबतची पत्रके वाटण्यात आली. या अभियानाला उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक संदीप कित्ते, परिवहन कार्यालयाचे अधिकारी मंगेश नाईक, समीर चव्हाण, रोहित जाधव, सुजित कुमार सिंह  आदी उपस्थित होते.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply