Breaking News

बारावीच्या परीक्षेत सीकेटी विद्यालयाचे सुयश

एकूण 99.01 टक्के निकाल

पनवेल : रामप्रहर वृत्त
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी 2020मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल गुरुवारी (दि. 16) जाहीर करण्यात आला. बारावी परीक्षेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील (नवीन पनवेल) विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. शाळेचा एकूण निकाल 99.01 टक्के लागला आहे.
कला शाखेत 105 पैकी 96 विद्यार्थी (91.42 टक्के), विज्ञान शाखेत 695 पैकी 692 विद्यार्थी (99.56 टक्के), तर वाणिज्य शाखेत 414 पैकी 414 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन 100 टक्के
निकाल लागला आहे.
कला विभागात प्रवीण शेडगे 492 गुण (75.69 टक्के) मिळवून प्रथम, क्रिष्णकुमार जुगणकर 487 गुण (74.92 टक्के) द्वितीय, तर गौरी घोलप 473 गुण (72.76 टक्के) मिळवून तिसरी आली आहे. कला शाखेचा निकाल 91.41 टक्के लागला आहे. वाणिज्य विभागात निधी देशमुख 595 (91.53 टक्के) गुण मिळवून पहिली, शिवलाल गुड्डी 581 (89.38 टक्के) गुण मिळवून दुसरा, तर चंद्रत्ना तांडेल 578 (88.92 टक्के) गुण मिळवून तिसरी आली आहे. विज्ञान विभागात रुचिरा कारनेकर 624 (96 टक्के) गुण मिळवून पहिली, इशा पाटील 613 (94.30 टक्के) गुण मिळवून दुसरी, तर भार्गव मोडक 609 (93.69 टक्के) गुण मिळवून तिसरा आला आहे.
विज्ञान शाखेत 68 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य, 261 विद्यार्थ्यांनी प्रथम, 353 विद्यार्थ्यांनी द्वितीय, तर 10 विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तीन विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्य शाखेत 53 विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्य, 147 विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी, 202 विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणी मिळाली, तर 12 विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेत एका विद्यार्थ्यास विशेष प्राविण्य, 15 विद्यार्थ्यांना प्रथम, 77 विद्यार्थ्यांना द्वितीय दर्जा मिळाला, तीन विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले, तर नऊ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपकार्याध्यक्ष वाय. टी. देशमुख, सचिव एस. टी. गडदे, प्राचार्या इंदुताई घरत, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply