पनवेल : रायगड जिल्ह्यात गुरुवारी (दि. 16) 402 नवीन रुग्ण आढळले आहेत. रायगडात नवीन लॉकडाऊन सुरू झाल्यावर पहिल्याच दिवशी 19 जणांचा मृत्यू झाला, तर 266 रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रात 134, पनवेल ग्रामीणमध्ये 63, अलिबाग 50, पेण 32, खालापूर 29, कर्जत 26, उरण 17, रोहा 16, श्रीवर्धन 13, महाड नऊ, म्हसळा आठ, मुरूड चार व सुधागडमध्ये एक कोरोना रुग्ण आढळला. पनवेल महापालिका क्षेत्रात सात, अलिबाग तीन, उरण व खालापूर प्रत्येकी दोन, तर पेण, मुरूड, म्हसळा, महाड व पोलादपूर येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला. रायगडात कोरोना रुग्णांची एकूण संख्या 9260 झाली असून 249 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात 31372 टेस्ट करण्यात आल्या. त्यापैकी 9260 पॉझिटिव्ह आल्या आहेत. 5472 जणांनी कोरोनावर मात केली, तर 3539 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
Check Also
आदई डोंगरावर वृक्षारोपण अभियान
आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तपर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आदई डोंगरावर …
RamPrahar – The Panvel Daily Paper