Tuesday , February 7 2023

माघी गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त

नवीन पनवेल येथील अस्मिता कला, क्रीडा, व सांस्कृतिक मित्र मंडळ, प्रियदर्शनी महिला मंडळ आणि अष्टविनायक पीएल 5 ओनर्स असोसिएशनच्या माघी श्रीगणेश जन्मोत्सव आयोजित करण्यात आला होता.

त्यानिमीत्त सत्यनारायणाची महापूजा, श्रीगणेश जन्मोत्सव, हळदी-कुंकू समारंभ, श्रींची पालखी आदी धार्मिक कार्यक्रम झाले. या कार्यक्रमांना पनवेल पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

या वेळी पनवेल महापालिकेच्या नगरसेविका सुशीला घरत, माजी नगसेविका वर्षा नाईक, मनिषा चिले, गौरी पवार, शोभा पन्हाळे, लक्ष्मी चव्हाण, शारदा माने यांच्यासह पदाधिकारी, रहिवाशी आणि नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply